Birthday Wishes for Brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Birthday Wishes for Brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Heart touching birthday shayari in marathi for brother Funny birthday shayari in marathi for brother, Birthday shayari in marathi for brother from sister, Big brother birthday wishes in
birthday wishes for brother in marathi

marathi, Heart touching birthday wishes for brother In marathi

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 

जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. 
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.

काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर. 
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे. 

जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Messages For Brother In Marathi
काहीजणांना साध्या सरळ शुभेच्छा द्यायला आवडतात तर काहींना कविता करायला आवडते. मग तुमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Birthday Messages For Brother In Marathi) द्या. जसं भावाला शुभेच्छा देणं आलं तसंच त्याच्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देणं ही महत्त्वाचं आहे.
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या. 

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Elder Brother In Marathi
Birthday Wishes For Elder Brother In Marathi
मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला आदर्श असतो.ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो. जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो. अशा मोठ्या भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Brother In Marathi). 

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. 
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत. (marathi language big brother birthday wishes for brother in marathi)
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Younger Brother in Marathi
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Younger Brother in Marathi
Birthday Wishes For Brother In Marathi
जसा मोठा दादा हक्काचा तसाच छोट्या भावावरही हक्क आपण गाजवतोच नाही का, हे कर रे.. ते कर रे म्हणत त्याच्याकडून सगळी काम करून घेतो. आपल्या छोट्या भावाला तुम्हीही नक्कीच तुमच्या कामाला लावून हैराण करत असाल. पण त्याच्या वाढदिवशी मात्र प्रेमळ मेसेज (Birthday Wishes For Younger Brother in Marathi) करून तो अविस्मरणीय करा. 


छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.


हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.


थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
छोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.


तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे, हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस
मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो.
 Brother Quotes In Marathi | भावासाठी कोट्स
भावाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा | Best Birthday Wishes For Brother In Marathi






0 Comments